पहिले अभ्यंगस्नान करण्यात बालचची गडबड
प्रतिनिधी/ सातारा
दिवाळी सण म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा, मांगल्याचा सण.मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने एवढय़ा उत्साह दिवाळीत दिसत नव्हता.पहाटेच्या अभ्यंगस्नानाला घराघरात बालचम्मूनी गडबड करत पहिला फटाका फोडण्याचा आनंद घेतला.दिवाळी फराळावर ताव मारत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.सातायात दरवर्षी पहाटे संगीत मैफिल होत असते यावर्षी मात्र ऑन लाईन मैफिल पार पडली.तर लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त वेळेवर साधण्याची लगबग दिसत होती.जिह्यातील गडकिल्ले दिव्यांनी उजळून निघाले होते.
दीपावली सणाचे पहिले अभ्यंगस्नान करण्यासाठी घरोघरी बाल चम्मूची गडबड दिसत होती.चंदन उठणे लावून स्नान करून बालचम्मू नवीन कपडे घालून पहिला फटाका फोडताना गल्लोगल्ली दिसत होते.यावर्षी कोरोनामुळे अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे.उत्साहाचे, आनंदाचे सण ही मोकळ्यापणाने साजरे करता येत नाहीत.पुन्हा कोरोना येण्याची भीती असल्याने प्रत्येक जण काळजी घेऊनच पहिले अभ्यंगस्नान करून घरातच काहींनी दिवाळी साजरी केली.तर काहींनी फटाके न फोडण्याचा संकल्प केला.दरवर्षी सातारा शहरात गांधी मैदान व शाहूपुरी चौकात दिवाळी पहाटेचा संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो. यावर्षी कोरोनामुळे ऑन लाईन मैफिल आयोजित करण्यात आली होती.गीत गाता चल हा कार्यक्रम शीतल धनवडे प्रस्तुत फेसबुकवर ऑन लाईन आयोजित करण्यात आला होता.दीपलक्ष्मी पतसंस्थेचे शिरीष चिटणीस यांनी हा कार्यक्रम घेतला होता.यामध्ये शशिकांत धनवडे, संजय क्षीरसागर, सुधीर मुळे, शामला काकडे या सहभागी झाल्या होत्या
गडकिल्ले निघाले उजळून
दिवाळीच्या पहिल्या दिवशीच पहिला दिवा गडाला म्हणत सातारा जिह्यातील गडकिल्ले उजळून निघाले होते.किल्ले अजिंक्यतारा येथे छत्रपतींचे सेवक, वंदनगडावर श्री.शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, रायरेश्वरवर रायरेश्वर युवा प्रतिष्ठान, सज्जनगडावर परळी खोयातील कार्यकर्त्यांनी आदी जिह्यातील गडावर दीपोत्सव करण्यात आला.