- 1,071 ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 145 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 37 हजार 900 वर पोहचली आहे. यामधील 1,071 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 97 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 25 हजार 929 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,900 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 19 लाख 71 हजार 940 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 44,673 आरटीपीसीआर टेस्ट आणि 19,140 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.33 % आणि मृत्यू दराचे प्रमाण 1.71%आहे. तर 631 झोन आणि 124 कंट्रोल रूम आहेत.