ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत दररोज सरासरी 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. मागील 24 तासात दिल्लीत 1,904 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारी नुसार, सोमवारी 1411 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 59 हजार 619 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 6 लाख 40 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8, 032 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू दराचे प्रमाण 1.67 % इतके आहे. सद्य स्थितीत 11,012 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 44 लाख 71 हजार 835 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 52,490 आरटीपीसीआर टेस्ट आणि 16,315 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.56 % आहे. तर 1849 झोन आणि 406 कंट्रोल रूम आहेत.