सेल्फी पॉईंट बहरला, तरूणाईसह जेष्ठ मंडळी घेत आहेत सेल्फीचा आनंद
प्रतिनिधी /सातारा
पोवईनाका येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘राजधानी सातारा’ हे सेल्फी पॉइं&ट उभारले आहे. याचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सेल्फी पॉईंट गर्दीने फुलून गेला आहे. याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी तरुणाईसह वयस्कर सातारकरांची गर्दी होवू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती.
शिवतीर्थाच्या समोर नुकताच सेल्फी पॉइंं&ट उभारला गेला आहे. त्यामुळे पोवईनाक्याच्या वैभवात आणखी भरच पडली आहे. दोनच दिवसांपूर्वी याचे उdदघाटन वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर हा सेल्फी पाईंट नागरिकांसाठी खुला करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांनी तब्बल दोन वेळा या पॉइं&टला भेट दिल्यामुळे राजधानी सातारा सेल्फी पॉइं&टला भेट देवून तिथे सेल्फी घेणे हे सगळय़ांना औत्सुक्याचे वाटू लागले आहे.
गेडसेपरेटरवर कोरेगावकडे जाणाऱया रस्त्यावर उभारलेला हा सेल्फी पॉईंट सुरू होवून फक्त दोन दिवस झाले आहेत. या सेल्फी पॉईटवर आता नागरिक गर्दी करत आहेत. दिवसा ग्रामीण भागातून येणारी नागरिक येथे फोटो काढत आहेत. तर रात्रीच्या वेळी तरुणाई आपल्या मित्र परिवारासोबत येथे सेल्फीचा आनंद घेत आहे. अनेकजण आपल्या कुटुंबासमवेत येथे येत आहेत. तसेच जेष्ठ मंडळीनाही सेल्फीचा मोह आवरत नसल्याने तेही सेल्फी काढत आहेत. रात्री लाईंटमुळे सेल्फी पॉईंट उजळुन निघत आहे. सेल्फी पॉईंटमुळे परिसर गजबजून जात आहे.