उदनराजेंनी केले भवानी तलवारीचे पूजन
शहरातील दुर्गा उत्सव मंडळांनी केले साधेपणाने विसर्जन
बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल, सराफ पेढीत शुकशुकाट
झेंडूला सोन्याचा भाव
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचे संकट लवकर निघून जाऊ दे अशी विनवणी करत दुर्गा मातेला सातारा शहरातील दुर्गा उत्सव मंडळानी निरोप दिला. सातारा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली परंतु सोने-चांदी बाजारात सातरकरांनी पाठ फिरवली होती.खासदार उदयनराजे यांनी जलमंदिर पॅलेस येथे भवानी तलवारीचे विधिवत पूजन करण्यात आले. दरम्यान, झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव आला होता.
यावर्षी सर्वच सण उत्सव हे कोरोनामुळे उत्साहात साजरे करता आले नाहीत.दसरा या सणाला मोठे महत्व असले तरी कोरोनाचे सावट दिसत होते. शहरात दरवर्षी होणारी दसऱ्याच्या मिरवणूक रद्द करण्यात आली होती.दुर्गा माता विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आल्या होत्या. सातारा पालिकेने बुधवार नाका, पोहण्याचा तलाव आणि हुतात्मा स्मारक येथे विसर्जनाची तयारी केली होती. त्यानुसार दुपारपासून दुर्गा मूर्तीचे विसर्जन अगदी साधेपणाने होत होते.पालिकेचे अधिकारी देखरेख करत होते.
जल मंदिर पॅलेस येथे भवानी तलवारीचे पूजन
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी साताऱ्यात होणारा शाही दसऱ्याची मिरवणूक रद्द करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने पुरोहितांच्या मंत्र उच्चरात खासदार उदयनराजे यांच्या हस्ते जल मंदिर पॅलेस येथे भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
बाजारपेठेत मोठी उलाढाल
कोरोनाचे सावट असल्याने सराफ बाजारावर मंदी दिसत होती. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदीच्या शोरूममध्ये गर्दी दिसतं होती. नवनवीन बांधकाम साईटचे उद्घाटन शहरात अनेक ठिकाणी झाली.
झेंडूच्या फुलांचा तुटवडा
यावर्षी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यातच अधिक मास आल्याने दसरा हा सण उशिरा आला. तोपर्यंत झेंडूच्या फुलांचा हंगाम निघून गेला. त्यामुळे बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा जाणवत होता.सातारा शहरात रविवारी सकाळी 600 ते 700 रुपये किलो झेंडूची फुले मिळत होती.