प्रजासत्ताक दिन सोहळय़ाला प्रारंभ ः नेव्ही बँडने वाजवली ‘बॉलिवूड’ धून, चित्ररथांचेही सादरीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारपासून राजपथावर प्रजासत्ताक दिन सोहळय़ाला प्रारंभ झाला. आता हा सोहळा 30 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी पहिल्या दिवशी सुरक्षा दल आणि विविध विभागांचे संचलन सोहळे आणि चित्ररथांची दिमाखदार रंगीत तालीम पार पडली. मुख्य सोहळा 26 जानेवारीला होणार असून कार्यक्रमातील फ्लायपास्ट सकाळी 10 ऐवजी 10.30 वाजता सुरू होणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रविवारी 125 वी जयंती होती. यानिमित्त देशात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष सुरू झाला. रविवारपासून फुल डेस रिहर्सल सुरू झाली. दिल्लीच्या कडाक्मयाच्या सकाळमध्येही ही रंगीत तालीम पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक जमले होते. तीन दिवसांवर आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा होणाऱया प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ामध्ये केंद्र सरकारने दोन महत्त्वाचे बदल केल्यामुळे यंदापासून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू झाला आहे. राजपथवर प्रजासत्ताक दिनाच्या परेडची रंगीत तालीम सुरू आहे. सैन्याच्या तुकडय़ा आणखी दोन दिवस अंतिम कामगिरीचा सराव करतील. दिल्लीत रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची फुल डेस रिहर्सल पार पडली. ही संपूर्ण परेड 26 जानेवारी रोजी सर्वांना थेट प्रक्षेपणाद्वारे दूरदर्शनवरून पाहता येणार आहे. सैन्याच्या मार्चिंग तुकडय़ा, रणगाडे, तोफगोळे आणि बँड या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
राजपथ सज्ज, सुरक्षाही कडेकोट
दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात सुमारे 1 हजार ड्रोन, 75 लष्करी विमाने, 12 राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालये सहभागी होणार आहेत. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला येणाऱया प्रेक्षकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या वषी 25 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. प्रजासत्ताक दिन सोहळय़ादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्लीसह देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
बॉलिवूड धूनवर राजकीय पक्षांचा आक्षेप
दरम्यान, ब्रेकमध्ये नौदलाच्या बँडने बॉलिवूड गाण्याची धून वाजवल्यानंतर सैनिकांनी नाचायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माय गव्हर्नमेंट इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘मोनिका… ओ माय डार्लिंग’ गाण्याची धून ऐकू येत आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बॉलीवूडच्या या धूनवर आक्षेप घेतला आहे. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी “हय़ा प्रजासत्ताक सोहळय़ाला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ ऐकायला मिळाली. आता पुढच्या प्रजासत्ताक दिनी, स्वातंत्र्यदिनी काय होईल हे कोणी सांगू शकेल का?’’ असे ट्विट केले आहेत. तसेच आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीमचे सदस्य असलेल्या कपिलने “सिनेमागृहात राष्ट्रगीत आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील मोनिका ओ माय डार्लिंगमुळे देशातील तमाशाकरण दररोज नवीन उंची गाठत आहे !’’ असे म्हटले आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत हँडलवरूनही या व्हिडीओला लक्ष्य करण्यात आले. मात्र, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ आवडल्याचे म्हटले आहे.