वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी बंधू संचलित राजर्षि शाहू को-ऑप. सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश बाबुराव चौगुले यांची तर व्हाईस चेअरमनपदी विक्रमसिंह पुंडलिक कदम (पाटील) यांची निवड करण्यात आली. आणि त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. निवड पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
संस्थेच्या सभागृहात आयोजित निवड कमिटी समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार खात्याचे आर. आर. गोवनकोप्प होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सुरेश चौगुले यांचा सत्कार सभासद सुरेश जाधव यांच्या हस्ते तर व्हाईस चेअरमन विक्रमसिंह कदम (पाटील) यांचा सत्कार माणिक होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संचालक अशोक बामणे, महादेव (राहूल) होनगेकर, नरसिंह पाटील, हेमंत पाटील, राजू जाधव, गजानन सुतार, बेबी पाटील, शोभा जाधव, टी. एस. पाटील, सचिव सविता शहापूरकर, अक्षता सुतार, पिग्मी संकलक किशोर कदम, राजाराम अष्टेकर यांच्यासह व्यापारीबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित
होते.