नवी दिल्ली / प्रतिनिधी
बहुजन उद्धारक, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे 6 मे रोजी स्मृतीशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संसदेतील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्य़ाला ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मलिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्वपक्षीय 35 खासदारांनी बुधवारी अभिवादन केले. संसदेचे कामकाज 8 एप्रिल रोजी समाप्त होणार आहे.
त्याआधी अभिवादनाचा हा कार्यक्रम खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने झाला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, खासदार श्रीनिवास पाटील, अरविंद सावंत, संजय राऊत, सुप्रिया सुळे, रजनीताई पाटील, डॉ. प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, प्रियांका चतुर्वेदी, कलाबेन डेलकर, हिना गावित, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, नरेंद्र जाधव, विनायक राऊत, प्रतापराव जाधव, अनिल देसाई, राजेंद्र राऊत यांच्यासह अँटो अँटोनी (केरळ), प्रिन्स राज (बिहार), अशोक सिद्धार्थ (उत्तरप्रदेश), रामजी गौतम (उत्तरप्रदेश), बी. बी. पाटील (आंध्रप्रदेश), डॉ हनुमंतैया (कर्नाटक) उपस्थित होते.