बेळगाव
कोनवाळ गल्ली येथील राजश्री तुडयेकर यांचा मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मलबार हिल येथे झालेल्या गो-रक्षक सेवा ट्रस्ट मुंबईतर्फे त्यांच्या सामाजिक व उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. बेळगाव जिल्हा शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजू तुडयेकर यांच्या त्या पत्नी आहेत.