प्रतिनिधी/ सातारा
मराठय़ांची राजधानी साताऱयाला मोठे महत्व आहे. याच राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजाचे पूत्र शाहु महाराज यांचा राज्यभिषेक दि.12 जानेवारीला किल्ले अजिंक्यताऱयावर झाला. तोच दिवस राजधानी साताऱयात किल्ले अजिंक्यतारा येथे श्री शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने गेल्या काही वर्षापासून साजरा केला जात आहे. यावर्षीही रविवार दि. 12 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन किल्ले अजिंक्यतारा येथे राजसदरेवर करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, सल्लागार दीपक प्रभावळकर यांनी दिली.
एतिहासात मराठय़ांनी जे अटकेपार झेंडे लावले. त्या मोहिमेचा आदेश साताऱयाच्या किल्ले अजिंक्यताऱयावरील राजसदरेवरुन देण्यात आला होता. किल्ले अजिंक्यताऱयाला वेगळे महत्व अधोरेखीत आहे. छत्रपती शाहु महाराज यांचा राज्यभिषेक किल्ले अजिंक्यताऱयावर दि.12 जानेवारीला झाला आणि त्याच दिवशी अजिंक्तारा ही राजधानी बनली गेली. शाहु महाराजांनी सातारा शहर वसवले गेले आहे. त्यांच्या पराक्रमांना उजाळा मिळावा याकरता साताऱयातल्या श्री. शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही स्वाभिमान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाभिमान दिनाचे नियोजन झाले आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी सकाळी 7 वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. किल्ले अजिंक्यताऱयावर अलिकडे नियमित शिवभक्त व शाहुभक्त स्वच्छता मोहिम राबवत असतात. रविवारी सकाळी शाहुभक्त गडाचे प्रवेशद्वार, तसेच कार्यक्रमाचे ठिकाण फुलांनी सजवणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावर्षी शाही पालखी मिरवणूक गडावरील राजसदरेवर काढण्यात येणार आहे. मंत्री शभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, इतिहासतज्ञ डॉ. संदीप महिंद, अजय जाधवराव, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अविनाश कदम, संदीपभाऊ शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये यावर्षी सातारा हिल मॅरेथॉनची जबाबदारी पूर्णतः महिलांकडे असणार आहे. जागतिक पातळीवरची ही स्पर्धा पार पाडण्याकरता महिलांनी जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे हिल मॅरेथॉनच्या महिला पदाधिकाऱयांचा विशेष सन्मान मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्यामुळे साताऱयाच्या जिजाऊंच्या शेकडो लेकी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत क्रांतीची ज्योत प्रज्वलीत करुन राजसदरेवर येणार आहेत. राजसदरेवरच्या आयोजित कार्यक्रमात फिनिक्स ऍकॅडमीचे उमेश काशिद, कमांडो ऍकॅडमीचे दया सर, फोर्स ऍकॅडमी, ढाणे क्लासेस, संदीपभाऊ शिदे आणि सातारा कास मॅरेथॉन ग्रुप, प्रगती पाटील आणि जाळपट्टा ग्रुप यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड आणि सल्लागार दीपक प्रभावळकर यांनी दिली.