सॅमसनच्या नेतृत्वाखाली 6 गडी राखून एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब
मुंबई / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज ख्रिस मॉरिसची (4-23) भेदक गोलंदाजी व संजू सॅमसनच्या (41 चेंडूत नाबाद 42) संयमी, पण आक्रमक फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने शनिवारी आयपीएल साखळी सामन्यात केकेआरचा 6 गडी राखून फडशा पाडला. त्यांनी प्रारंभी केकेआरला 9 बाद 133 धावांवर रोखले व प्रत्युत्तरात 18.5 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
तुलनेने माफक असे 134 धावांचे लक्ष्य असताना कर्णधार संजू सॅमसनने 41 चेंडूत 42 तर शिवम दुबे, नवोदित यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी 22 धावांचे योगदान दिले. जोस बटलर (5), राहुल तेवातिया (5) मात्र स्वस्तात बाद झाले. कर्णधार सॅमसननेच विजयी धाव घेत केकेआरच्या संघर्षाला पूर्णविराम दिला.
राजस्थान रॉयल्स ः जोस बटलर पायचीत गो. वरुण 5 (7 चेंडूत 1 चौकार), यशस्वी जैस्वाल झे. बदली खेळाडू (कमलेश नागरकोटी), गो. मावी 22 (17 चेंडूत 5 चौकार), संजू सॅमसन नाबाद 42 (41 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शिवम दुबे झे. प्रसिद्ध कृष्णा, गो. वरुण 22 (18 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), राहुल तेवातिया झे. बदली खेळाडू (कमलेश), गो. प्रसिद्ध कृष्णा 5 (8 चेंडू), डेव्हिड मिलर नाबाद 24 (23 चेंडूत 3 चौकार). अवांतर 14. एकूण 18.5 षटकात 4 बाद 134.
गडी बाद होण्याचा क्रम
1-21 (बटलर, 3.2), 2-40 (जैस्वाल, 4.5), 3-85 (दुबे, 10.5), 4-100 (तेवातिया, 13.4).
गोलंदाजी
शिवम मावी 4-0-19-1, पॅट कमिन्स 3.5-0-36-0, वरुण चक्रवर्ती 4-0-32-2, सुनील नरेन 4-0-20-0, प्रसिद्ध कृष्णा 3-0-20-1.