भीलवाडा
राजस्थानच्या भीलवाडा शहरात मंगळवारी रात्री उशिरा युवकाच्या हत्येनंतर तणाव निर्माण झाला आहे. या हत्येच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी बंदची हाक दिल्याने प्रशासनाने इंटरनेट बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. तणावपूर्ण स्थिती पाहता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. हत्येप्रकरणी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. 20 वर्षीय आदर्श तापडिया हा दुचाकीवरून जात असताना दोन युवकांना त्याला रोखून चाकूने वार केला होता. आदर्शच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झला. मृताचे कुटुंबीय 50 लाख रुपयांची भरपाई आणि आरोपींना अटक करण्याची मागणी करत आहेत. यापूर्वी घडलेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.