ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये शनिवारी एका दिवसात 118 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 12 हजार 186 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी कोरोना व्हायरसमुळे 3 जणांचा मृत्यू झाला. आज झालेल्या 3 मृतांपैकी एक जण भरतपूरमधील आहे. तर अन्य दोघे जण हे जयपूर मधील रहिवासी आहेत. त्यामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 275 झाली आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोनामुळे जयपूरमध्ये आत्तापर्यंत 125 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जोधपूरमध्ये 27 आणि कोटा मधील 18, अजमेर मध्ये 12, भरतपूर मध्ये 12 आणि अन्य राज्यातील 16 जणांचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्याची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये कोरोना रुग्णांची रुग्ण संख्या सर्वाधिक असून तेथील 2497 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सध्या राज्यातील एकूण 12,186 कोरोना रुग्णांपैकी 2585 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.