ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये एका दिवसात 76 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 7 हजार 376 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जयपूर 16, उदयपूर मध्ये 13, झालावाड मध्ये 12, राजसमंद मध्ये 11, झुंझुनू व बिकानेर मध्ये प्रत्येकी 5, कोटा 4, पाली मध्ये 3 आणि धौलपुर मधील 2 रुग्णांचा समावेश आहे.
राजस्थान मध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 167 वर पोहोचली आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या जयपुर मध्ये आहे. कोरोनामुळे जयपूरमध्ये आत्तापर्यंत 79 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जोधपूरमध्ये 17 आणि कोटा मधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढे ते म्हणाले, अधिकतर रुग्ण हे कोणत्या ना कोणत्या गंभीर आजारांनी पहिल्यापासून त्रस्त होते.
दरम्यान, राज्यात 22 मार्चपासून लॉक डाऊन जारी असून, अनेक ठिकाणी कर्फ्यू लावला आहे.