ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये गुरुवारी 287 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 16 हजार 296 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर मागील चोवीस तासात 4 जणांनी जीव गमावल्याने मृतांची एकूण संख्या 379 झाली आहेे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राजस्थानमध्ये 3 हजार 77 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 12 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुढे ते म्हणाले, आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये जोधपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 3120, अलवर 400, अजमेर 480, बांसवाडा 93, बांरा 64, बाडमेर 240, भरतपूर 1437, भिलवाडा 243, बिकानेर 229, बूंदी 13, चित्तोडगड 208, चूरू 289, दौसा 123, धौलपुर 555, डुंगरपूर 424, गंगानगर 50, हनुमानगड 58, जैसलमेर 101, जालौर 262, झालावाड 375, झुंझुंनूं 323, जोधपुर 2580, करौली 76, कोटा 585, नागौर 609, पाली 1024, प्रतापगड 15, राजसमंद 227, सवाईमाधोपुर 91, सीकर 493, सिरोही 395, टोंक 200 आणि उदयपुरमधील 677 रुग्णांचा समावेश आहे.