ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये मागील 24 तासात कोरोनाचे 2,132 रुग्णांची नोंद झाली. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 61 हजार 184 वर पोहचली आहे, अशी माहिती राजस्थानमधील आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आढळलेल्या 2,132 रुग्णांमध्ये अजमेरमधील 88, अलवार 159, बांस्वरा 18, बारन 1, बारमेर 21, भरतपूर 59, भिल्वारा 65, बिकानेर 353, बुंदी 9, चितोरगर 26, चुरु 39, दऊसा 10, ढोलपूर 24, दुंगरपुर 19, गंगानगर 57, हनुमानगर 16, जयस्मेर 14, जयपूर 396, जलोरे 8, झालवार 3, झुंझूनु 4, जोधपूर 331, करौली 29, कोटा 56, नागौर 67 पाली 54, प्रतापगड 11, राजसमंद 26, सवाई माधोपुरमध्ये 11, सिकार 22, सिरोही 15, टोंक 46 आणि उदयपूरमधील 75 जणांचा समावेश आहे.
या राज्यात आतापर्यंत केवळ 1,665 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 21,671 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 1 लाख 37 हजार 848 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.