ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये मागील 24 तासात कोरोनाचे 740 रुग्णांची नोंद झाली. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या 98 हजार 116 वर पोहचली आहे, अशी माहिती राजस्थानमधील आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सापडलेल्या 740 रुग्णांमध्ये अजमेर मधील 60, अलवार 82, बांस्वरा 11, बारन 10, बारमेर 0, भरतपूर 12, भिल्वारा 0, बिकानेर 51, चितोरगर 29, चुरु 0, दऊसा 0, ढोलपूर 0, दुंगरपुर 16, गंगानगर 20, हनुमानगर 18, बुंदी 0, जयपूर 115, जलोरे 14, झालवार 14, झुंझूनु 12, जोधपूर 89, कोटा 47, नागौर 32 पाली 21, प्रतापगड 0, राजसमंद 24, सवाई माधोपुरमध्ये 0, सिकार 28, सिरोही 11 आणि उदयपूरमधील 18 जणांचा समावेश आहे.
या राज्यात आतापर्यंत केवळ 1,199 जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये जयपूरमधील सर्वाधिक 295 जण, जोधपुरमधील 116 आणि कोटातील 80 तर अजमेर मधील 86 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांची लागण झाली होती.
दरम्यान, सध्या राज्यात 16,427 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 80, 490 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.