ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये आज कोरोनाचे 772 रुग्ण वाढले असून, राजस्थानमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या 91 हजार 678 वर पोहचली आहे, अशी माहिती राजस्थानमधील आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सापडलेल्या 772 रुग्णांमध्ये अजमेर मधील 32, अलवार 64, बांस्वरा 10, बारन 20, बारमेर 16, भरतपूर 11, भिल्वारा 21, बिकानेर 38, चितोरगर 20, चुरु 7, दऊसा 0, ढोलपूर 12, दुंगरपुर 8, गंगानगर 7, हनुमानगर 0, बुंदी 33, जयपूर 108, जलोरे 0, झालवार 23, जोधपूर 108, कोटा 78, नागौर 15, पाली 21, प्रतापगड 21, राजसमंद 31, सवाई माधोपुरमध्ये 6, सिकार 22, सिरोही 8 आणि उदयपूरमधील 9 जणांचा समावेश आहे.
या राज्यात आता पर्यंत केवळ 1, 147 जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये जयपूरमधील सर्वाधिक 289 जण, जोधपुरमधील 110 आणि कोटातील 80 तर अजमेर मधील 78 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांची लागण झाली होती.
दरम्यान, सध्या राज्यात 15,562 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.