ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये शनिवारी आणखी 91 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राजस्थान मधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 4 हजार 838 वर पोहचली आहे. तर जयपूर जिल्ह्यात आणखी 48 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत जयपूरमध्ये 55, डुंगरपुरमध्ये 21, उदयपूरमध्ये 9, सिरोहीमध्ये 2 आणि कोटा व भरतपूर मध्ये प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडले आहेत. जयपूर मधील 55 रुग्णांमधील 48 तर जिला जेल मधील आहेत.
राज्यात आता पर्यंत 125 जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. तर जयपूर मध्ये मृत्यूंची 63, जोधपूरमध्ये 17 तर कोटा मधील 10 जणांनी आपला जीव गमावला आहे.