ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमधील कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्यामध्ये काही सौम्य लक्षणे दिसून आल्यावर मी माझी कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यात माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझे सर्वांना आवाहन आहे की, मागील काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन घ्यावे तसेच आपली कोरोनाची टेस्ट देखील करावी.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास हे 28 ऑगस्ट रोजी नीट आणि जेईई परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत प्रताप सिंह खाचरियावास यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.