प्रतिनिधी /पणजी
म्हापसा गांधी चौक येथील हॉटेल रेसिडेन्सी येथे एम व्ही हँडीक्राफ्टतर्फे आयोजित केलेल्या राजस्थान ग्रामीण मेळाला गोमंतकीयांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सदर प्रदर्शन विक्रीसह आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण भारतातील कापड, रेशीम, हॅण्डलूम, हस्तकला आणि दागिने यात मांडण्यात आले आहेत. सदर प्रदर्शनात देशातील पूर्व भागातील ग्रामीण कारगीरांचा समावेश आहे. राजस्थानची हस्तकला आणि हॅण्डलूम, उत्तर प्रदेशातील ब्लू पेव्हिंग, शरणपूर येथील कुर्जा पेव्हिंग, लाकडावरील कोरीवकाम, संगमरवरी कलाकृती, राजस्थान ज्वेलरी, रत्न आणि सोन्याचे दागिने, लखनऊ सिकन कोरीवकाम, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील बेड रग, कलाकारी साडी आणि कापड, कानातली आणि कुर्ते, बंगाली शुद्ध कॉटन कपडे आणि साडय़ा. मलमल, चंदेरी, पश्चिम बंगाल, मदुराई, सुंगुडी, लेडीज टॉप्स आणि आदी वस्तू यात मांडण्यात आल्या आहेत. राजस्थानचे हस्तनिर्मित दागिने, कार्पेट्स, मोझडी, संगमरवरी हस्तकला, पेटिंग्ज,बांधनीसारख्या कापडांचे कपडे यात मांडण्यात आले आहेत.
ढाका येथील विश्वजित साहा यांनी ढाकाई मलमल जमदानी साडी या प्रदर्शनात सादर केली आहे. प्रदर्शनात भेटवस्तू उत्पादने भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. सदर मेळा दि. 5 सप्टेंबरपर्यंत हॉटेल रेसिडेन्सी, म्हापसा, गांधी चौक येथे सुरू राहणार आहे.