सामन्यात एकंदरीत 449 धावांची आतषबाजी झालेला राजस्थान-पंजाब यांच्यातील सामना बरेच चढउतार दर्शवणारा ठरला. प्रारंभी पंजाबने 223 धावांचा डोंगर रचल्यानंतर कर्णधार केएल राहुलने कबूल केल्याप्रमाणे त्यांनी व सर्वांनी विजय जणू गृहितच धरला होता. पण, राजस्थानच्या राहुल तेवातियाने सर्व समीकरणांची प्रचंड उलथापालथ करुन टाकली. याच लढतीदरम्यान राजस्थानचे प्रशिक्षक ऍन्डय़्रू मॅकडोनाल्ड व किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या चेहऱयावर बरीच चिंता दिसून आली. अंतिमतः मॅकडोनाल्ड यांचा राजस्थान रॉयल्सचा संघ विजेता ठरला, मॅकडोनाल्डना दिलासा लाभला तर या स्पर्धेतील एकमेव भारतीय प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळे 224 धावांचेही संरक्षण करु न शकलेल्या आपल्या पंजाब संघावर नाराज असणे साहजिक होते.
Previous Article‘तो’ विक्रम न केल्याबद्दल युवराजने मानले आभार!
Next Article रोमांचक टायनंतर आरसीबीचा सनसनाटी विजय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.