बिकानेर
राजस्थानच्या बिकानेरमध्ये रविवारी संध्याकाळी 6.56 वाजण्याच्या सुमारास 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याला दुजोरा दिला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या हद्दीत बिकानेरपासून 381 किमी अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेला असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 19 किमी खोलीवर होता. यापूर्वी 20 नोव्हेंबरच्या रात्री राजस्थानच्या जालोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती.