ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थान मधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः पूनिया यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, गुरुवारी मी जोधपूर दौऱ्यावरून आल्यानंतर जेव्हा कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझ्यामध्ये कोणतेही कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती तरी देखील माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
पुढे ते म्हणाले, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरामध्येच आयसोलेट झालो आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः ची देखील कोरोना टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, जोधपूर दौऱ्यावर असताना पूनित यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची चर्चा आहे.