वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संपूर्ण भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घेतले असून हजारो लोकांचे बळी पडले असून दररोज लाखो लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. तथापि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया राजस्थान रॉयल्स संघाच्या फ्रांचायजीने गुरूवारी कोरोनाग्रस्तांसाठी 7.5 कोटी रूपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने जनतेनेमध्ये भीती निर्माण झाली असून बुधवारी 3,79,257 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत भारतामध्ये कोरोना रूग्णांची एकूण संख्या 1,83,76,524 झाली आहे. रॉयल राजस्थान फौंडेशन आणि ब्रिटीश एशियन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील कोरोनाग्रस्तांसाठी अल्पशी मदत जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटीश एशियन ट्रस्ट (बीएटी) चे प्रिन्स चार्ल्स यांनी भारताला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने भारतीय रूग्णालयांना ऑक्सिजन खरेदीसाठी 50 हजार अमेरिकन्स डॉलर्सची मदत दिली होती.