वृत्तसंस्था/ लंडन
राजस्थान रॉयल्समधील अव्वल दर्जाचा इंग्लिश क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळू शकणार नसल्याचे संकेत आहेत. स्टोक्सचे वडील आजारी असून त्यामुळे स्टोक्स किमान पहिल्या काही सामन्यात तरी उपलब्ध होणे कठीण असणार आहे. स्टोक्सला राजस्थानने 12.5 कोटी रुपये मोजत करारबद्ध केले आहे.
जागतिक स्तरावर सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून गणला जाणाऱया बेन स्टोक्सने मागील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या वडिलांना मेंदूचा कर्करोग झाला असून त्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अर्थातच, स्टोक्सने त्यांच्या उपचारावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे.
न्यूझीलंडमधील अटीनुसार, स्टोक्सने नुकताच 14 दिवसांचा क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केला असून यानंतर तो आपल्या वडिलांची भेट घेईल आणि कुटुंबियांसमवेत काही वेळ व्यतित करेल, असे सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
राजस्थान रॉयल्सने स्टोक्सवरच निर्णय सोडून देण्यात आला आहे. 29 वर्षीय बेन स्टोक्सने 67 कसोटी, 95 वनडे व 26 टी-20 सामने खेळले असून त्याने गतवर्षी आयसीसी वनडे विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. 2019 ऐतिहासिक ऍशेस कसोटी विजयात त्याचे शतकच निर्णायक ठरले होते.
दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक फीजिओला कोरोना
दुबई : दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक फिजिओथेरपिस्ट कोरोनाबाधित असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. सदर फीजिओ यापूर्वी सक्तीच्या क्वारन्टाईनमध्ये होते आणि त्यांच्या पहिल्या दोन चाचणींचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तिसऱया चाचणीतील अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.
‘त्या फीजिओsने अद्याप संघातील कोणाचीही भेट घेतली नव्हती आणि कोणत्या खेळाडूच्या किंवा सदस्याच्या संपर्कातही ते आले नव्हते. ते स्वतः विलगीकरणात होते. यापुढेही पुढील 14 दिवस ते क्वारन्टाईन असतील’, असे दिल्ली प्रँचायझीने स्पष्ट केले. दोन चाचणीत अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्ली कॅपिटल्स पथकात समाविष्ट होता येईल. या फीजिओsचे नाव गुलदस्त्यात ठेवले गेले असून यंदा युएईमध्ये आयपीएलमध्ये कोरोनाचा संसर्ग होणाऱया व्यक्तींची संख्या आता 15 वर पोहोचली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आंद्रे रसेलला बढती देणार?
यंदाच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ विंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलला तिसऱया स्थानी बढती देण्याचे संकेत आहेत. सध्या या प्रस्तावावर त्यांच्या संघव्यवस्थापनात चर्चा सुरु आहे. मागील हंगामात आंद्रे रसेलला कोणत्या स्थानी फलंदाजीला पाठवायचे, यावर बरीच चर्चा झडली होती. त्यावेळी, प्रारंभी उत्तम सुरुवात केल्यानंतर केकेआरला सलग सहा पराभव पचवावे लागले होते. विशेषतः ईडन गार्डन्सवर आरसीबीविरुद्धचा पराभव कोलकाता नाईट रायडर्सच्या बऱयाच जिव्हारी लागला. त्या लढतीत रसेलने 25 चेंडूत 65 धावांची आतषबाजी केली. पण, त्याचे प्रयत्न अधुरे राहिले होते.