धामणे : राजहंसगड येथे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला राजहसंगड गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आमदारांचे सुपूत्र मृणाल हेब्बाळकर व एपीएमसी सदस्य युवराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंजूर झालेल्या गावापासून स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे पूजन करण्यात आले. हा रस्ता गावापासून स्मशानभूमीपर्यंत काँक्रीटचा होणार असून या कामासाठी 42 लाख रुपयांचा निधी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शासनाकडून मंजूर केला आहे. याप्रसंगी सुळगा (ये.) ग्राम पंचायत अध्यक्षा गंगव्या नाईक, ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील, नंदिहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्षा नागव्वा कुरबर, सदस्य मल्लिकार्जुन कुरबर, देसूर ग्रा. पं. सदस्य सतीश चव्हाण, जी. के. पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य सिद्धाप्पा छत्रे, रामू हावळ, रामचंद्र थोरवत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राजहंसगडावरील बसविण्यात येणाऱया छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. चौथऱयाचे काम प्रगतीपथावर आहे. गडावर महाराजांच्या मूर्तीची स्थापना देशातील आणि राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मृणाल हेब्बाळकर यांनी दिली. त्याचप्रमाणे गावातील युवकांच्या मागणीप्रमाणे गावापासून स्मशानभूमीपर्यंत विद्युतखांब बसवून येथे रात्रीच्या दिव्याची सोय लवकरच करणार असल्याचेही यावेळी आश्वासन दिले. यावेळी मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देवून गावकऱयांच्यावतीने करण्यात आला. एस. एम. बेळवटकर यांनी आभार मानले.