वार्ताहर / राजापूर
कोरोनामुक्त झालेल्या राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून कारोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तर 10 कारोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये सोमवारी शहरातील रानतळे येथील एक, सागवे कात्रादेवी येथील 3 व तळवडे येथील 2 रूग्णांचा समावेश आहे. त्यानंतर मंगळवारी पाचल पेठवाडी येथील तीन तर धामणपे येळवण येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 348 झाली असून यापैकी 18 रूग्ण सध्या उपचार घेत आहेत.