वार्ताहर / राजापूर
शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याच्या बंदुकीतील गोळी सुटून शिकाऱ्याचाच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील पारवाडी येथे घडली आहे. सोमवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली. या पकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी राजापूर तालुक्यातील नवेदर येथील दोघेजण शिकारीसाठी धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात गेले होते.
यावेळी शिकारीसाठी नेलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती एकाच्या पोटाच्या भागाकडे लागली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच नाटे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱयांनीही भेट देऊन माहिती घेतली. यापकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.