वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील भालावली येथील श्री लक्ष्मी माधव मंदिरात चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱयाचे कुलुप तोडून आत पवेश करत देवांच्या चांदीच्या मुखवट्यांसह दागिने असलेला पेटारा चोरून नेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळी हा पकार निदर्शनास आला. मंदीराचे पुजारी रमाकांत पाध्ये हे नित्य पुजेसाठी मंदीरात आले असता त्यांना मंदिराचा गाभारा उघडा असल्याचे लक्षात आले. अधिक माहिती घेता गाभाऱयातील देवांचे मुखवटे दागिने असलेला पेटारा जागेवर नसल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना व पोलिसांना माहिती दिली.
अज्ञात चोरट्यांनी रात्री ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या चोरीत अज्ञात चोरट्यांनी देवांचे तीन चांदीचे मुखवटे व देवांच्या गळयातील सोन्याचा मुलामा असलेल्या चांदीच्या साखळया चोरीला गेल्या असल्याची पाथमिक माहिती आहे. घटनास्थळी नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप काळे दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.