राजापूर
कोकण रेल्वे मार्गावर राजापूर-खारेपाटणमध्ये मोसमदरम्यान सोमवारी सांयकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कोकण रेल्वे दक्षता कर्मचाऱयांनी त्वरित दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली.
सोमवारी सांयकाळी 7.30 वाजता कोकण रेल्वे मार्गावर मोसमदरम्यान ट्रकवर दरड कोसळल्याने या दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. सावंतवाडी-दादर ही गाडी वैभववाडी येथे तर मडगाव-मुंबई ही कणकवली येथे थांबविण्यात आली. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांनी त्वरित ट्रकवरील दगड-माती हटवून वाहतूक पुन्हा सुरू केली.
…