प्रतिनिधी/इस्लामपूर
येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या 10 मे. टन क्षमतेच्या दूध भुकटी प्रकल्पाचे तसेच राष्ट्रीय पशुधन योजने अंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते शुक्रवार 17 जानेवारी रोजी होणार असल्याची मा†िहती, संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ना. जयंत पाटील हे अध्यक्षस्थानी आहेत. तर या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, माहीती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच आ. मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संघाने केंद्र शासनाचे राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत संघ कार्यस्थळावर 10 मे. टन क्षमतेचा रु.24.40 कोटी रु.चा दूध भुकटी प्रकल्प उभारलेला असून या प्रकल्पास शासनाचे 50 टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. तर संघ कार्यस्थळावर केंद्र शासनाचे राष्ट्रीय पशुधन योजने अंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेचे काम पुर्ण झालेले असून या प्रयोगशाळेकरीता शासनाकडून रु. 2 कोटीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. यामध्ये शासनाचे 60 टक्के अनुदान प्राप्त झालेले आहे.