उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध संस्थानिक राजा महेंद्रप्रताप हे हाथरस येथील संस्थानचे सम्राट होते. आजही त्यांचे नाव अनेक कारणास्तव घेतले जाते. पूर्वीच्या संस्थानिकांपैकी ज्यांची लोकप्रियता आणि सामाजिक बांधिलकी आजही मानली जाते, अशा महाराजांपैकी ते एक होते. त्यामुळे त्यांच्या सवयी आणि जीवनशैली आजही चर्चेचा विषय बनलेली आहे. अशा या महाराजांना विटीदांडू खेळण्याचा मोठाच शौक होता, असे अलीकडच्या संशोधनात दिसून आले आहे. वास्तविक ते टेनिस आणि बुद्धिबळ खेळण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते. आपल्या संस्थान क्षेत्रात या दोन खेळांची लोकप्रियता वाढविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही सर्वज्ञात आहेत. तथापि, त्यांना स्वतःला या दोन खेळांपेक्षाही अधिक प्रमाणात विटीदांडू खेळण्याची आवड होती, हे नवे संशोधन आश्चर्यकारक मानण्यात येत आहे. लहान असताना हे महाराज जेव्हा शाळेत जात तेव्हा त्यांची वहय़ापुस्तके घेऊन जाण्यासाठी विशेष नोकरांचा ताफा असे. हे नोकर त्यांच्यासाठी विशेष बनविलेला विटीदांडूही शाळेत घेऊन जात असत. विटीदांडू खेळण्याचा हा शौक त्यांनी मोठेपणेही त्यांनी जपला होता, अशी नवी माहिती मिळालेली आहे.
Previous Articleहीच ती वेळ; राजकारण्यांनी समाजकारण करण्याची!
Next Article बीरभूम जिल्हय़ात निवडणूक हिंसाचार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.