ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांची आज 30 वी पुणयतिथी आहे. या निमित्त काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट देखील केले आहे.
राहुल गांधी यांनी राजीव गांधी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. सत्य, करुणा आणि प्रगती असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. तसेच राहुल गांधी यांनी आज सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीरभूमीवर जावून पुुुष्प्प अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली.
- प्रियांका गांधींनी केले ट्विट
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील ट्विट करत आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, प्रेमापेक्षा दुसरी मोठी कोणतीही शक्ती नाही, दया शिवाय दुसरे कोणतेही साहस नाही आणि विनम्रते शिवाय दुसरा कोणताही गुरू नाही, असे म्हणत आपल्या वडिलांची आठवण काढली आहे.