क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
केजीबी स्पोर्ट्स क्लबचे आधारस्तंभ व ज्येष्ट क्रिकेटपटू राजू डी. कागीनकर यांच्यासह बेळगावातील काही क्रिकेटपटू मागील 15 दिवसांच्या कालावधीत काळाच्या पडद्याआड गेले. बेळगावातील क्रिकेटच्या जडणघडणीत या सर्वांचा मोलाचा वाटा राहिला. या सर्वांना विविध संघटनांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. राजू कागिनकर यांच्याप्रमाणे केजीबीचे संस्थापक कर्णधार यशवंत तोडणकर, केकेटी काकती संघाचे अष्टपैलू दीपक गवी, गोल्डन स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क संघात खेळणारे मध्यमगती गोलंदाज राजेश सालगुडे यांचेही निधन झाले. गेल्या 15 दिवसात या दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन झाल्यामुळे बेळगावमधील क्रिकेट क्षेत्राची मोठी हानी झाली
आहे. त्यांना सोमवारी विविध टेनिसबॉल क्रिकेट संघटनांनी सरदार्स हायस्कूल मैदानावर श्रद्धांजली वाहिली.
यावेळी ज्येष्ट क्रिकेटपटू अनंत सावंत, गंगाधर पाटील, रमेश गोवेकर, दस्तगिर अलवाडकर, नागेश चव्हाण, गणेश बडवाण्णाचे, लारा ललित, युवराज, आकाश, सुनिल आणि रमेश आदी क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजू कागिनकर यांच्या श्रद्धांजलीचा फ्लेक्स सरदार्स मैदानावर लावण्यात आला.