राजेंनी केले रिक्षा सजवल्याबाबत कौतुक
प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजेंनी त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आकाशातून बाईक बाईक सवारी करत कार्यक्रमस्थळी उतरले होते. त्याचीच राज्यभर चर्चा अजून सुरु आहे. त्यातच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रिक्षा स्पर्धेमध्ये विजयी झालेली कराडची रिक्षा आज आयोजकांनी खासदार उदयनराजेंच्या हस्ते सत्कार करण्यानिमित्ताने बोलवली होती. त्यांनी ती रिक्षा सजवल्याबाबत रिक्षा चालकाचे कौतुक केले. स्वतः एक रपेट मारली.
खासदार उदयनराजेंचे ड्रायव्हींग सगळय़ा सातारकरांना चांगलेच ज्ञात आहे. ते त्यांच्या ऑडीपासून बुलेटपर्यंत. तर कधी कार्यकर्त्यांच्या मोपेडचे हॅण्डलही हाती घेतील याचा नियम नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा साताऱयात कार्यकर्त्यांच्या दुचाकीवरुन रपेट मारल्या आहेत. नुकत्याच त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हवेतून उडत्या बाईकवरुन थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन केले होते. त्यांच्या त्या हटके एन्ट्रीची अजूनही चर्चा सुरु आहे. त्यांच्याच वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रिक्षा स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या कराडचे सचिन शिंदे यांचा खासदार उदयनराजेंच्या हस्ते सन्मान करण्याकरता खास आयोजकांनी रविवारी बोलवले होते. रविवारी जलमंदिर येथे खासदार उदयनराजेंच्या हस्ते त्या विजेत्या रिक्षा चालकाचा गौरव करण्यात आला. त्याची रिक्षा पाहून खासदार उदयनराजेंनी रिक्षा चालवली अन् त्याचे कौतुक केले. रिक्षामध्ये खासदार उदयनराजेंच्यावर बनवलेले लावले होते.