प्रतिनिधी / पणजी
हिमाचल प्रदेशचे नूतन राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आलेले गोव्याचे माजी सभपती राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार सोहळा लोकमान्य सोसायटीतर्फे संपन्न झाला. लोकमान्य सोसायटच्या ताळगाव शाखेतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकमानय सोसायटीच्या संचालिका सई ठाकूर यांनी पुष्पगुच्छ प्रदान करुन स्वागत केले तर परिवार त्रैमासिकाचे अतिथी संपादक डॉ. गोविंद काळे यांनी श्रीफळ व समई देऊन त्यांचा सत्कार केला.
‘लोकमान्य’सोसायटीकडे विश्वासार्हता नावाची महत्त्वाची गोष्ट आहे म्हणूनच सोसायटीला लोकमान्यता लाभली आहे. उत्तरोतर सोसायटीची प्रगती वाढत आहे. भविष्यात देशभर लोकमान्यच्या शाखा उघडल्या जावून राष्ट्रीय स्तरावरील ‘लोकमान्य सोसायटी’ असा लौकिक संस्थेस लाभो अशा सुभेच्छा. राजेंद्र आर्लेकर यांनी दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोसायटीचे असिस्टंट रिजनल मॅनेजर ऍथनी आझोवेदो यांनी केले. विभागीय रिजनल मॅनेजर कुमार प्रियोळकर, श्री अवधूत कामत, गायत्री नायक व अन्य सहकारी कार्यक्रमास उपस्थित हाते.
‘प्रार्थना म्हणण्यासाठी नसून प्रार्थनेप्रमाणे जीवन जगता आले पाहिजे’ पततु एश कायो’ देशासाठी काया धरणी पडो’ अशा पद्धतीने कार्य करणारे ‘बोले तैसा चाले’ अशा शब्दात डॉ. काळे यांनी त्यांचा परिचय करुन दिला.