नामांतराबाबत महिलांची खा. उदयनराजेंना आर्जव
प्रतिनिधी/ सातारा
बसाप्पा पेठ व राधीका रोड परिसरातील नागरिकांतर्फे येथील चौकाला कै.सतीश उर्फ टिल्लु दादा पवार असे नामकरण करण्याबाबतची आर्जव खासदार उदयनराजे भोसले यांना शनिवारी करण्यात आली. यावेळी त्यांना निवेदन देखिल देण्यात आले. याप्रसंगी सतीश मतकर, विजय राऊत, ज्ञानेश्वर तोडकर आदींसह परिसरातील महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होत्या.
यानिवेदनात सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱया विविध लोकांचे रस्त्याला व चौकाला नाव देऊन नगरपालिकेच्या वतीने बोर्ड लावण्यात आले आहेत. कै.सतीश उर्फ टिल्लु दादा पवार हे सन् 2001 ते 2006 मध्ये सातारानगर पालिकेचे नगरसेवक होते. तसेच शहर विकास नियोजन समितीचे सभापती ही होते. त्याचबरोबर ते मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत होते.
नगरसेवक असताना त्यांनी बसाप्पापेठ, राधीका रोड व करंजे परिसरात मोठय़ा प्रमाणावर विकास कामे केली आहेत. सातारा शहराच्या विविध विकासकामांसाठी कै.सतीश उर्फ टिल्लु दादा पवार यांचे मोलाचे योगदान होते. सर्व सामान्य लोकांसाठी ते तळमळीने कोणत्याही वेळी हजर राहुन कामे करत असत. ते सामाजिक, खासगी व सार्वजनीक जिवनातील सर्व नागरिकांची कामे तत्परतेने करत असत. येथील नागरिकांचे ते आधारस्तंभ होते.
बसप्पा पेठ, ढोर गल्ली कडुन करंजेकडे जाणाऱया रस्त्यावरील विजया बँक शेजारी चौकास कै.सतीश उर्फ टिल्लु दादा पवार असे नामकरण करण्याबाबत जो ठराव सातारा नगरपालिकेमध्ये मंजुर केला आहे. त्याप्रमाणे ताबडतोब कार्यवाही करावी. सातारा नगरपालिकेमध्ये त्यांच्या कार्याचे स्मरण रहावे म्हणुन, बसाप्पा पेठ, ढोर गल्लीकडुन करंजेकडे जाणारे रस्त्यावरील विजया बँक शेजारी चौकास कै.सतीश उर्फ टिल्लु दादा पवार जे नाव दिले आहे. त्यासाठी आम्हा सर्व नागरिकांच्यावतीने नगरपालिकेचे अभिनंदन आहे. तरी सदर ठिकाणी नगरपालिकेच्यावतीने बोर्ड लावण्याची कार्यवाही तत्परतेने करावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.