विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे करणार उद्घाटन
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवारी (5 एप्रिल) कोल्हापूर जिल्हा दौऱयावर येत आहेत. या दौऱयात ते महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील प्रेसिडेंट व चान्सलर अवॉर्ड कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः मंगळवार 5 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. 10:20 वाजता विमानतळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 10:55 वाजता शासकीय विश्रामगृह येथून महासैनिक दरबार हॉल बावडा, कोल्हापूरकडे प्रयाण. 11 वाजता महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थिती. 11:45 वाजता महासैनिक दरबार हॉल येथून शिवाजी विद्यापीठाकडे प्रयाण. दुपारी 12:00 वाजता शिवाजी विद्यापीठातील शाहू हॉल येथे आयोजित प्रेसिडेंट व चान्सलर अवॉर्ड कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. दुपारी 12:45 वाजता शिवाजी विद्यापीठ येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. व दुपारी 1 वाजता कोल्हापूर येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.