प्रतिनिधी / कोल्हापूर
दिल्ली येथील मरकजमध्ये प्रार्थनेसाठी गेलेल्या कोल्हापूर जिल्हयातील २१ जणांचा समावेश असल्याबाबत प्रशासनाला माहिती प्राप्त झाली आहे. त्या दृष्टीने खात्री करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी बुधवार १ एप्रिल रोजी दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग मध्ये याविषयी चौकशी केली. तसेच येथे वास्तव्य करणाऱ्या नऊ जणांना कोरोनाच्या तपासणीकरिता सीपीआरमध्ये दाखल केले.
महाराष्ट्रातून ३०० हून अधिक व्यक्ती दिल्ली येथे गेल्या होते. तेथून हे लोक परत आले. मात्र ही लोक आपली माहिती लपवत आहेत. प्रशासनाला सहकार्य करत नाहीत अशी माहिती मुंबई मध्ये समोर आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. या गोष्टीमुळे चिंतेत असलेले प्रशासन सक्रीय झाले आहे. राज्यभरातील या घडामोडीनंतर या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने शहरातील विविध मशिदी, बोर्डिंग मध्ये सध्या वास्तव्य करणाऱ्या अनेक व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
एक एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी दसरा
चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या कार्यालयात बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांच्याकडे दिल्ली येथे गेलेल्या नागरिकांनी बोर्डिंग मध्ये वास्तविक केले आहे का ? यासंदर्भात चौकशी केली.तसेच बिल्डिंगमध्ये सध्या वास्तव्यास असणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना बाबत तपासणी करण्यासाठी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.