ऑनलाईन टीम / अमरावती :
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांचे आज दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि.13) सकाळी 10 वाजता बेलोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बच्चू कडू यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.