नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने राज्यसभा नेतेपदी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची निवड केली आहे. सध्या ते राज्यसभेत उपनेते आहेत. थावरचंद गेहलोत कर्नाटकाचे राज्यपाल झाल्यानंतर हे पद रिक्त होते. ते सदन व्यवस्थापनात कुशल मानले जातात. तत्काळ तोंडी तलाक आणि घटनेचा अनुच्छेद 370 हटविणे या विधेयकांवर राज्यसभेत संख्याबळ जमवताना त्यांचे हे कौशल्य दिसून आले होते. सर्व विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. नव्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उद्योग आणि व्यापार, ग्राहककल्याण आणि अन्न व सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग हे विभाग देण्यात आले आहेत.