उत्तरप्रदेशात सर्व उमेदवार बिनविरोध
वृत्तसंस्था/ लखनौ
राज्यसभेसाठी उत्तरप्रदेशातील 10 जागांसाठी सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच निवडणूक अधिकाऱयाने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर इतिहासात पहिल्यांदाच भाजप राज्यसभेत सर्वोत्तम स्थितीत पोहोचला आहे. तर काँग्रेस स्वतःच्या इतिहासातील सर्वात बिकट स्थितीत गेला राज्यसभेत भाजप आतापर्यंतच्या शिखरावर आहे. तर काँग्रेसच्या जागा इतिहासात सर्वात कमी झाल्या आहेत. भाजपचे राज्यसभेतील बळ आता 92 झाले असून काँग्रेसचे केवळ 38 खासदार आहेत. रालोआचे सभागृहातील बळ आता 112 होणार आहे. बहुमताच्या आकडय़ापासून हा आकडा केवळ 10 ने कमी आहे.