सांगली : प्रतिनिधी
सांगली, मिरज या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्यसेवा पुर्व परीक्षा-2021 एकूण 24 हायस्कुल , महाविद्यालयाच्या ठिकाणी 23 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात 23 जानेवारी रोजीचे सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजपर्यंत हा मनाई आदेश लागू केला आहे.