प्रतिनिधी / सावंतवाडी:
डॉट कोम्स असोसिएशन आयोजित राजस्तरीय कथावाचक स्पर्धेत सावंतवाडी आरपीडी हायस्कुल च्या पाचवी ची विद्यार्थिनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागातील 300 हून अधिक स्पर्धेकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अस्मिला तिची आई प्रा सुषमा मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आरपीडी हायस्कूल चे मुख्याध्यापक जगदीश धोंड, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष विकासभाई सावंत, स्कुल कमिटी चेअरमन डॉ दिनेश नागवेकर, सर्व शिक्षक व संस्था चालकांनी अस्मिचे अभिनंदन केले आहे.
अस्मि हिने प्रसिद्ध साहित्यिक बबन शिंदे यांची नवा गणवेष या कथेचे अभिवाचन केले होते.