सांबरा ः बेंगळूर येथे कर्नाटक स्पोर्ट्स कराटे डू असोसिएशन यांच्यावतीने आयोजित कर्नाटक कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कणबर्गीच्या सुमित बिर्जे व सौरभ मालाई यांनी सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविला.
सुमित बिर्जेने 50 किलो वजन गटात तर सौरभ मालाईने 55 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्यांना एसएसएस फौंडेशनचे अध्यक्ष संजय सुंठकर, राजेश मेणसे, सिद्धार्थ कडोलकर व आकाश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.