ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘म्युकरमायकोसिस’ या आजारावरील औषधाच्या 23,680 वायल्स देण्यात आल्या आहेत. औषधांचे हे वाटप राज्यांमधील एकूण रुग्णसंख्येच्या आधारे केले गेले आहे. सर्व राज्यांमध्ये आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 8848 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी यासंदर्भात माहिती दिली.