ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा वार्षिक अर्थसंकल्प आज दुपारी 2 वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच विधिमंडळाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.
मुंबईतील जे.जे. रुग्णालयाने विधिमंडळातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, 6 आणि 7 मार्चला विधिमंडळातील 2,746 जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते. यापैकी 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, काल महाराष्ट्रात कोरोनाच्या 11,141 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले. अशाप्रकारेच रुग्ण संख्या वाढत राहिल्यास राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केले जाईल अशा चर्चांनी जोर धरला आहे.