हरकती, सूचना पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राज्याच्या जेटी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला असून त्यावरील हरकती आणि सूचनांसाठी तो जनतेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
राज्यात पर्यटन व्यवसाय वाढीच्या उद्देशाने विविध भागात जेटी उभारण्यात येणार असून त्यासंबंधी खास धोरण तयार करण्यात आले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेटी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
जल-आधारित पर्यटन आणि मनोरंजन उपक्रमांच्या माध्यमातून पर्यटन वाढविणे हा सरकारचा उद्देश असला तरी यातील काही जेटींवर भविष्यात मोठी प्रवासी क्रूझ जहाजेही बांधण्यात येतील, अशी माहिती पसरल्याने समाजाचे विविध घटक, संस्था यांच्याकडून या जेटींना आतापासूनच मोठा विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे त्यावर जनतेकडून सूचना, सुधारणा, मते, हरकती मागविण्यात आल्या आहेत.
सदर ‘जेटी धोरण मसुदा 2022’ हा पर्यटन खात्याच्या संकेतस्थळावरही अपलोड करण्यात आला आहे. त्यावरील हरकती, सूचना जास्तीत जास्त 500 शब्दात पाठविता येतील. या सूचना दि. 15 ऑक्टोबरपर्यंत पीएमयू ऍट गोवा-टुरिझम डॉट कॉम या ईमेल पत्त्यावर पाठवाव्यात, असे कळविण्यात आले आहे.