प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्याच्या सीमेवरील जिल्हय़ाना भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी दिली. म्हैसूरला जाण्यापूर्वी बेंगळूरमधील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. आपण सोमवारी म्हैसूर जिल्हा दौर्यावर करत असून तेथील कोरोना पाfरस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणार आहे, असे ते म्हणाले.
म्हैसूर जिल्हा दौर्यावेळी त्यांनी चामुंडी टेकटीवर चामुंडेÍवरी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर सुत्तूर मठाचे शिवरात्री देशीकेंद्र स्वामीजाची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान, त्यांनी जिल्हा भाजप कार्यालयालाहि भेट देऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा केली.
म्हैसूर जिल्हा भाजप कार्यालयात स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, जगात सर्वाधिक सदस्य असणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. पक्ष, पक्षनिष्ठा आणि पक्षातील कार्यक्रमांची अंमलबजावणी हाच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संकल्प असला पाहिजे. हि कामे पुढील दोन वर्षात पूर्णlवास नेण्याचा प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.